आमदार संजय गायकवाड यांची तरुणांना मारहाण, चाकू घेऊन हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते म्हणून त्यांना मारहाण केले : आ. संजय गायवाड

(योगेश शर्मा)

Mar 2, 2024 - 16:33
 0  1242
आमदार संजय गायकवाड यांची तरुणांना मारहाण, चाकू घेऊन हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते म्हणून त्यांना मारहाण केले : आ. संजय गायवाड

बुलढाणा (आरएनआई) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत संजय गायकवाड तरुणांना मारहाण करताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा शिवजयंतीच्या मिरवणुकीतला असल्याची माहिती समोर आली असून मारहाण करणारे तरुण चाकू घेऊन हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते म्हणून मी त्यांना मारहाण केल्याचे स्पष्टीकरण आ. संजय गायवाड यांनी दिले आहे। 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संजय गायकवाड पोलिसांच्या काठीने एका तरुणाला अतिशय अमानुषपणे मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. संजय गायकवाड यांच्यासह आणखी काही जण संबंधित तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एक लोकप्रतिनिधी भर गर्दीत काठीने बेदम मारहाण करताना पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई झाली, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही। 

तर या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आ. गायकवाड म्हणाले कि, ३० ते ४० हजार लोकांच्या गर्दीत पोलीस कमी पडले होते. जयस्तंभ चौकात गेल्यावर एक मुलगी माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली कि हे दोन तरुणांच्या कंबरेला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीत आहे. मी धावत त्या ठिकाणी गेलो, माझ्यासोबत माझा बॉडीगार्ड सुद्धा त्या ठिकाणी पोहचला। माझ्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही व्हिडीओ बघा, माझे बॉडीगार्ड योगेश मुळे याला अक्षरशः खाली पाडलेले आहे. ते दोघे पण हत्यार घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत असतांना मी काडी हिसकली आणि त्याला चोप दिला। 

Follow the RNI News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBPp7rK5cD6XB2Xp81Z

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RNI News Reportage News International (RNI) is India's growing news website which is an digital platform to news, ideas and content based article. Destination where you can catch latest happenings from all over the globe Enhancing the strength of journalism independent and unbiased.